HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|
भूपाळी कृष्णाची जाग रे जाग बापा । विश्र्व भूपाळी पंढरीची उठा उठा हो वेगेंसी । चला
भूपाळी रामाची - उठोनियां प्रातःकाळी । जपा...


देवाला जागे करण्यासाठी पहाटे जी गाणी म्हणतात, त्यांना 'भूपाळी' म्हणतात.
Poems that can be sung early morning while remembering God.


36GOOG
भूपाळी रामाची
उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दसांचे ॥ १ ॥
रामे तटका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णिली । गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षीलें भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
36GOOG
References : N/A

Created by TransLiteral /Courtsey {Khapre.org} on 2008-02-22T23:05:59.9121856-05:00

Comments | अभिप्राय