HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवांच्या भूपाळ्या|
भूपाळी श्रीदत्तप्रभूची पाहें पाहें सद्‌गुरुमूर्त भूपाळी श्रीदत्तप्रभूची उठि उठि दत्तात्रेया । करु
भूपाळी श्रीदत्तप्रभूची - उठीउठी बा श्रीगुरुवरा । श...


देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे.

Poems that can be sung early morning while remembering God.



10GOOG
भूपाळी श्रीदत्तप्रभूची

उठीउठी बा श्रीगुरुवरा । श्रीशेषशायी श्रीधरा ।

श्री विधि हरिहरा सुरवरा । श्रीदत्तात्रेयमूर्ती यतिवरा ॥ध्रु०॥

आले संत सनकादिक । सनकनंदन श्रीशुक ।

सनत्कुमार पुंडरिक । सनत्सुजात सनातन आले शौनक ॥उठी०॥१॥

अलर्क यदुवर प्रह्लाद । श्रीव्यास सप्‍तऋषि नारद ।

रैवतकाची मैत्री रुक्मांगद । आले जयविजय कुमुदनंद सुनंद हो ॥उठी०॥२॥

आले अंबऋषी प्रह्लादन । श्रीभीष्मदा लभ्य सुबिभीपण ।

पराशर योगी मुनी सिद्ध पूर्ण । आले चतुर्दिशेचे भक्त संपूर्ण हो ॥उठी०॥३॥

गंधर्व अप्सरा किन्नर करितां नृत्य सुस्वरें तुंबर ।

उठवुनि प्रार्थी गुरुभक्त प्रभुवर । प्रेमालिंगन देई सर्वां अभयवर हो ॥उठी०॥४॥

Translation - भाषांतर

N/A
10GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-11T01:57:31.2158464-04:00

Comments | अभिप्राय