HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|दत्त आरती संग्रह|
दत्ताची आरती आरती दत्तराजगुरुची । भव दत्ताची आरती जय जय दत्त दिगंबर अत्रिऋष
दत्ताची आरती - सुखसहिता दु :खरहिता निर्म...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



10GOOG
दत्ताची आरती

सुखसहिता दु:खरहिता निर्मळ एकांता ।

कलिमलदहना गहना स्वामी समर्था ॥

न कळे ब्रह्मांदिकां अंत अनंता ।

तो तूं आम्हां सुलभ जय कृपावंता ॥ १ ॥

जय देव जय देव जय करुणाकारा ।

आरती ओंवाळूं सद्‌गुरुमाहेरा ॥ धृ. ॥

मायेविण माहेर विश्रांति ठाव ।

शब्दी अर्थी लाव बोलणें वाव ।

सद्‌गुरुच्या प्रसादे सुगम ऊपाव ।

रामीं रामदास फळाला सद्‌भाव ॥ जय. ॥ २ ॥

Translation - भाषांतर

N/A
10GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T03:34:14.7002000-04:00

Comments | अभिप्राय