HOME|mr|aartya|devi|
देवीची आरती जय देवी जगदंबे । संकट देव देवीची आरती आद्यस्थान तुझे करविरपुर म
देवीची आरती - अंबे प्रार्थितसें तुजला म...


Devi Arati - Prayer to Godesses

11GOOG
देवीची आरती
अंबे प्रार्थितसें तुजला मी भावें ।  या समयी पावें ॥
मज संकट जननी त्वां निरसावें । वरदान द्यावें ॥ धृ. ॥
कां म्यां आणावे हरिसी सदना । आहा रे मदना ॥
छळिले मजला काय दावूं वदना । नच कां ये करुणा ॥ अंबे. ॥ १ ॥
माझा मज कांक कृतांत वाटे । निजकंदर दाटे ॥
जेणे हा भवसिंधू अतिशय वाटे । गतिसार न दाटे ॥ अंबे. ॥ २ ॥
अंबे अजुनी का न होसि तूं जागी ।  निष्ठुरता त्यागी ॥
श्रमलें यास्तव प्रार्थितसें मी तुजलागी । या धेनुरागी ॥ अंबे. ॥ ३ ॥
म्हणसी धात्याने जें लिहिले भाळी । तें कोण टाळी ॥
जें जें भवितव्य ज्या ज्या काळी । ते सुरवर पाळी ॥ अंबे. ॥ ४ ॥
तुझिया बिदुराचा घडतो पायां । करिसाल उपाया ॥
दावी निजजन दुष्ट मी कवणे पायां । उठिं ब्रह्मादि पायां ॥ अंबे. ॥ ५ ॥
राधा ये रितिनें करुणा भावी । भास्करसुतस्वामी सिद्भऋषि सुदावी । ते मूर्ति जपावी ॥ अंबे. ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
11GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-20T23:52:03.0386208Z

Comments | अभिप्राय