HOME|mr|aartya|devi|
सरस्वतीची संगीत आरती आरती ब्रह्मकुमारीला व संतोषी मातेची आरती जय देवी श्रीदेवी माते । व
अन्नपूर्णा देवीची आरती - श्री अन्नपूर्णे देवी जयजय...


अन्नपूर्णा देवीची आरती

29GOOG
अन्नपूर्णा देवीची आरती

श्री अन्नपूर्णे देवी जयजय जगदंबे जननीं ।
तुज ऎसी देवता नाही कोणी त्रिभूवनी ॥ धृ. ॥
विप्र धनंजय त्याची भार्या सुलक्षण होती ।
ती दोघेही अनन्यभावे तव भक्ति करिती ॥
तुझ्य़ा प्रसादे झाली त्यांना पुत्राची प्राप्ती ॥
सुखशांती लाभली देवी ऎशी तव कीर्ती ॥ १ ॥
नरदेहाचें सार्थक होते तव पूजन करुनी ।
नामस्मरणे सकलही जाती भवसागर तरुनी ॥
जीवन जरि हें भरले आहे व्याधि - उपाधींनीं ।
प्रसन्न परि तू होता सारे भय जाते पळूनी ॥ २ ॥
छंद मनाला तुझा लागला मी करितो धांवा ।
धावुनी ये देंवते पाहुनी मम भक्तीभावा ॥
अखंड शाश्वत प्रेमसुखाचा दे मजला ठेवा ॥
जन्ममृत्यूचा फेरा चुकवी ठाव पदी द्यावा ॥ ३ ॥
तूं माझी माऊली जाण मी बालक तव तान्हा ।
क्षमस्व माते अपराधांची करूं गणना ॥
अन्नवस्त्र दे वैभव सारे सुखभोगहि नाना ।
मिलिंदमाधव करी प्रार्थना वंदुनी तव चरणां ॥ ४ ॥
Translation - भाषांतर

N/A
29GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T13:34:12.1786560Z

Comments | अभिप्राय