HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|इतर आरती संग्रह|
आरती काळभैरवाची जय जय श्रीशिवकाशीविश्‍वेश आरती अनसूयेची जय शिखरेश्‍वरि भगवंते । भ
आरती अनसूयेची - जयदेवी, जयदेवी, जय देववंद...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



5GOOG
आरती अनसूयेची

जयदेवी, जयदेवी, जय देववंदे । श्रीवेदवंदे

श्रीअनसूये, माये, जय मंगळ वरदे ॥धृ०॥

जयजय श्रीचतुराननदेवात्मज कांते

जयजय कर्दमदुहिते, दत्तात्रय माते

येती तडि तापडि यति भवदाश्रमातें

पावति मुनिजन-खगमृगगण-विश्रामातें ॥जय० ॥१॥

नाना गुल्मलताद्रुम-अमृतरसवल्ल्या

आनंदघन पदवैभव श्रीहरि कैवल्या

सुपुत्रवंत्या भार्गवि, देवकि, कौसल्या

वानिति अनसूये तव बहुविध कौशल्या ॥जय० ॥२॥

देउनि भोजन सकळां सकळांच्या पाठीं

करसी भोजन स्वसुतासह एक्या ताटीं

अनंत ब्रम्हांडांचे घट ज्याचे पोटीं

तो प्रभु ढेंकर देउनि अन्नांगुल चाटी ॥जय० ॥३॥

श्रीलक्ष्मी-पार्वति-सावित्रीसहभर्त्या

अखंड ऋद्धीसिद्धी नांदति गिरिवरि त्या

चौसष्ट-अठरा करती त्वद्‌गुणआवर्त्या

विष्णूदासाच्याही ऐकिसि पदार्त्या ॥जय० ॥४॥

Translation - भाषांतर

N/A
5GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-04-23T21:23:38.8688160-04:00

Comments | अभिप्राय