HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गणपती आरती संग्रह|
गणपतीची आरती स्थापित प्रथमारंभी तुज मं गणपतीची आरती जय देव जय देव जय वक्रतुंड
गणपतीची आरती - वेदशास्त्रांमाजी तूं मंगल...


Ganapati Aarti - Prayers for Lord Ganesha मंगल गणपतीची आरती - वेदशास्त्रांमाजी तूं मंगल

24GOOG
गणपतीची आरती
वेदशास्त्रांमाजी तूं मंगलमूर्ती।
अगणित महिमा तुझा कल्याण स्फ़ूर्ती॥
भक्तांलागी देसी विद्या अभिमत ती।
मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती॥१॥
जय देव जय देव जय मोरेश्वरा।
तुझा न कळे पार शेषा फ़णिवरा॥धृ.॥
पुळ्यापश्ये नांदे महागणपती।
माघ चतुर्थीला जनयात्रे येती।
जें जें इच्छिति तें तें सर्वही पावती।
गणराजा मज बाळा द्यावी अभिमती॥जय.॥२॥
एकवीस दुर्वांकुरा नित्ये नेमेसी।
आणूनि जे अर्पिती गणराजयासी॥
त्याचे तू भवबंधन देवा चुकविसी।
विठ्ठलसुत हा ध्यातो तुझिया चरणासी॥३॥
Translation - भाषांतर

N/A
24GOOG
References : N/A



Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-10-08T23:44:11.1617776Z

Comments | अभिप्राय