HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|गुरू आरती संग्रह|
गुरूची आरती मौजेची आरती मौजेचा देव । गुरूची आरती फळलें भाग्य माझें । धन्य
गुरूची आरती - दीनानाथा दीनबंधु दयाळा । ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



24GOOG
गुरूची आरती

दीनानाथा दीनबंधु दयाळा ।

पतितोद्धारकब्रीदा भक्तवत्सला ॥

शरण येतो त्याला आनंद वेला ।

परब्रह्मसुख देसी प्रेमला ॥ १ ॥

जय देव जय देव स्वामी समर्था ॥

आरती ओंवाळूं तव चरणीं नाथा ॥ धृ. ॥

तुजवाचुनि कोणी वाहीं आम्हांसी ॥

माता पिता बंधु मित्र तूं होसी ॥

उरौसीचे तीरी सज्जनगिरिवासी ॥

भावें लक्षूं जातां भवपार करिसी ॥ २ ॥

Translation - भाषांतर

N/A
24GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T03:09:02.9236864-04:00

Comments | अभिप्राय