HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|खंडोबा आरती संग्रह|
खंडोबाची आरती जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार
खंडोबाची आरती - जय देवा मार्तंडा । हाती घ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



24GOOG
खंडोबाची आरती

जय देवा मार्तंडा । हाती घेउनिया खंडा ॥

मारिले दुष्ट दैत्य । उडे त्रैलोकी झेंडा ॥ धृ. ॥

मातले पृथ्वीवरि । आणि मल्ल दैत्य दोनी ॥

टाकिले ऋषीयाग । यज्ञकुंड विध्वंसुनी ॥

म्हणुनीया अवतरले । गौरीहर शूळपाणी ॥ जय. ॥ १ ॥

साठ कोटी गण सवें । घेउनियां दैत्यावरी ॥

जाऊनियां युद्ध केलें । रण तुंबल भारी ॥

शिवचक्र दैत्यचक्र । युद्ध होय बरोबरी ॥ जय. ॥ २ ॥

त्रिशुळपाणी तप्त । थोर झाले क्रोधामुळें ॥

मारिले खङ्‌ग जेव्हां । दैत्याचे कंठनाळीं ॥

वरदान मागताती । प्राण अंताचे वेळी ॥ जय. ॥ ३ ॥

मल्ल म्हणे कर्पूरगौरा । हर हर महादेवा मल्हारी जनमुखिं ॥

ऎसा उच्चार व्हावा । उद्धरिले असुरातें ।

म्हणुनीं मल्लारी नांवा । जय. ॥ ४ ॥

चंपाषष्ठीचे दिवशी । ऎसा अवतार झाला ॥

आनंदले सुरवर । म्हणुनी येळकोट बोला ॥

चरणी तुझे लीन नामा ॥ देवा सांभाळी त्याला ॥ जय देवा. ॥ ५ ॥

Translation - भाषांतर

N/A
24GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-17T01:52:52.1111808-04:00

Comments | अभिप्राय