HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|श्रीकृष्ण आरती संग्रह|
श्रीकृष्णाची आरती कोटि कुर्वंडिया माधवपायां श्रीकृष्णाची आरती आरती भुवनसुंदराची । इंदि
श्रीकृष्णाची आरती - हरि चला मंदिरा ऎशा म्हणती...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



24GOOG
श्रीकृष्णाची आरती

हरि चला मंदिरा ऎशा म्हणती गोपिका म्हणती राधिका ।

भावें ओवाळिती यदुकुलतिलका ॥ धृ. ॥

एकीकडे राई, एकीकडे रखुमाई, भावें ओंवाळिता हरिसी तूं होसी दो ठायीं ॥ हरि. ॥ १ ॥

अष्टाधिक सोळा सहस्त्र ज्याच्या सुंदरा, ज्याच्या सुंदरा ।

जिणें जिणें प्रार्थिलें जासी तियेच्या घरा ॥ हरि. ॥ २ ॥

एका जनार्दनी हरि तूं लाघवी होसी ।

इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी ॥ हरि. ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
24GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T00:56:00.4180928-04:00

Comments | अभिप्राय