HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|पांडुरंग आरती संग्रह|
पांडुरंगाची आरती युगें अठ्ठावीस विटेवर उभा पांडुरंगाची आरती विठ्ठला मायबापा । वारीं
पांडुरंगाची आरती - येई हो विठ्ठले माझे माऊली...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हण्जेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


24GOOG
पांडुरंगाची आरती
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥ पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥ गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥
विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥ विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
24GOOG
References : N/A

Created by TransLiteral / Courtsey {Khapre.org} on 2007-07-13T19:20:31.0000000Z

Comments | अभिप्राय