HOME|mr|aartya|pandurang|
पांडुरंगाची आरती फळलें भाग्य माझें । धन्य पांडुरंगाची आरती जय जगज्जननि विठाबाई । उ
पांडुरंगाची आरती - संत सनकादिक भक्त मिळाले अ...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


29GOOG
पांडुरंगाची आरती
संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥
स्वानंदे गर्जती पाहुं आले कौतुक ॥ १ ॥
नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥
स्वर्गीहूनि सुरवर पाहुं येताति भावा ॥ धृ. ॥
नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥ 
ओवाळितां श्रीमुख धनी न पुरे मना ॥ २ ॥
एका जनार्दनी मंगल कौतुकें गाती ॥
मंगल आरत्या गाती मिळाले वैष्णव जयजयकारे गर्जती ॥ ३ ॥
Translation - भाषांतर

N/A
29GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-13T21:21:58.0000000Z

Comments | अभिप्राय