HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|रामचंद्राचीं आरती|
रामचंद्राचीं आरती साफल्य निजवल्या कौसल्या म रामचंद्राचीं आरती अयोध्या पुरपट्टन शरयूचे त
रामचंद्राचीं आरती - त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे ग...


रामचंद्राचीं आरती

5GOOG
रामचंद्राचीं आरती

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळां ।
आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा ॥ १ ॥
श्रीराम जय राम जय जय राम ।
आरती ओवाळूं पाहूं सुंदर मेघश्यामा ॥ धृ. ॥
ठकाराचे ठाण करी धनुष्यबाण ।
मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम. ॥ २ ॥
भरत शत्रुघ्न दोघे चौऱया ढाळित ।
स्वर्गीहूनी देव पुष्पवृष्टि करिती ॥श्रीराम. ॥ ३ ॥
रत्नखचित माणिक वर्णू काय मुगुटी ।
आरती ओवाळूं चवदाभुवनांचे पोटी ॥ श्रीराम. ॥ ४ ॥
विष्णुदास नामा म्हणे मागतो तूं ते ॥
आरती ओंवाळूं पाहू सीतापतीतें ॥
श्रीराम जय राम जय जय राम ॥ ५ ॥
Translation - भाषांतर

N/A
5GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T14:11:32.8305552Z

Comments | अभिप्राय