HOME|mr|aartya|rama|
रामचंद्राचीं आरती बंबाळ कर्पुराचे । दीप रत् रामचंद्राचीं आरती विडा घ्याहो रघुवीरा । राम
रामचंद्राचीं आरती - रत्नांची कुंडलें माला सुव...


रामचंद्राचीं आरती

29GOOG
रामचंद्राचीं आरती

रत्नांची कुंडलें माला सुविराजे ॥
झळझळ गंडस्थळ घननीळ तनू साजे ॥
घंटा किंकणी अंबर अभिनव गति साजे ।
अंदु वांकी तोडर नुपुर ब्रिद गाजे ॥ १ ॥
जय देव जय देव जय रघुवर ईशा ।
आरती निर्जरवर ईशा जगदीशा ॥ धृ. ॥
राजिव लोचन मोचन सुरवर नरनारी ।
परातपर अभयंकर शंकर वरधारी ।
भूषणमंडित उभा त्रीदशकैवारी ।
दासा मंडण खंडन भवभय अपहारी ॥ जय देव. ॥ २ ॥
Translation - भाषांतर

N/A
29GOOG
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-12-25T14:26:28.9991824Z

Comments | अभिप्राय