HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|शंकर आरती संग्रह|
शंकराची आरती जय जय आरती पार्वती रमणा ॥ शंकराची आरती शंभो शिवहर गौरी स्मरहर जय
शंकराची आरती - महारुद्रा जगन्नाथा शिवाभो...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.


1GOOG
शंकराची आरती ११

महारुद्रा जगन्नाथा शिवाभोळ्या शंकरा ॥
अति प्रेमें आरती ही करितों मीं तूजला ॥ धृ. ॥

भयकृद्भयभंजनादी ही नामें तुजप्रती ॥
विबुधादी सर्व प्रेमें तव सेवा वांछिती ॥
तव लीला वर्णनाची प्रीती असे मज अति ॥
भो ईशा सुप्रसादें दे दासा सद्‌गिरा ॥ महा. ॥ १ ॥

तव पादांबुज सेवा मम हातीं देउनी ॥
आसक्त भ्रमरप्राय रस द्यावा या जनीं ॥
उपदेश बोधुनीयां करि ऎसें मन्मनी ।
ज्ञानामृता पाजिं प्रेमें विठ्ठलात्मज किंकरा ॥ महा. ॥ २ ॥

Translation - भाषांतर

N/A
1GOOG
References : N/A

Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-07-13T23:46:55.0000000Z

Comments | अभिप्राय