HOME|मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|सूर्याच्या आरत्या|
सूर्याच्या आरत्या जय जय जगतमहरणा दिनकर सुखक
सूर्याच्या आरत्या - सप्तमुखी अतिचपळ रथिं तुझ्...


देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
The poem composed in praise of God is Aarti.



44GOOG
सूर्याच्या आरत्या

सप्तमुखी अतिचपळ रथिं तुझ्या वाजी ।

पदद्वयविरहित अरुण सारथ्यकाजीं ।

ऎसा तूं दिनकर बैससि त्यामाजीं ।

चिंतन करितां तुझें पावसि तूं सहजीं ॥ १ ॥

जय देव जय देव जय भास्करा ।

पंचारती ओंवाळूं तुज सहस्त्रकरा ॥ धृ ॥

तमनाशक प्रकाशक छायेचा रमण ।

प्रात:काळीं द्विजवर करिती अर्चन ॥

त्यांतें तूं दिनकर करिस पावन ।

महिमा न कळे तुझा तोंडी अज्ञान ॥ जय. ॥ २ ॥

तुज वाचुनियां लोकी सर्वहि शुन्यता ।

सकळां सौख्य होते तव उगम होतां ॥

ब्रह्मा हरिहर हेची तुझी स्वरुपता ।

शरणागता वसुदेव रक्षीं तूं सविता ॥

जय देव. ॥ ३ ॥

Translation - भाषांतर

N/A
44GOOG
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-03-16T02:49:54.7754160-04:00

Comments | अभिप्राय